Home क्राईम आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची पालकांकडून निर्घुण हत्या

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची पालकांकडून निर्घुण हत्या


download 1 1
 

अहमदनगर (वृत्तसंस्था) आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला जन्मदात्या आई -वडिलांनीच ठार मारुन तिचा मृतदेह जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार नेवाशातील कौठा गावात घडला आहे. प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, २४ दिवसांपूर्वीच दोघांनी लग्न केले होते. देवेंद्र कोठावले हा मेडिकल रिप्रेझिटिव्ह म्हणून काम करतो. तर मुलगी प्रतिभा मरकड ही मेडिकल दुकानात नोकरी करत होती. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला होता. म्हणून दोघांशी पळून जाऊन संगमनेरमधील एका मंदिरात विवाह केला होता. २४ एप्रिल रोजी प्रतिभा हिला आई- वडिलांनी संपर्क करून देवेंद्र यांच्याशी पुन्हा लग्न करून देऊ, असे सांगून गावाकडे बोलवून घेतले होते. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पत्नीचा मोबाइलवर पती देवेंद्रने संपर्क साधला पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर देवेंद्र व त्याच्या मित्राने मुलीचे गाव गाठले. त्यावेळी मरकड यांनी मुलीचा हार्ट अटकने निधन झाले. तसेच घरीच तिचा अंत्यविधी केला, असे सांगितले. पत्नीची हत्या केली आहे, असे म्हणताच देवेंद्रने करताच ब्रह्मदेव मरकड याने त्याला मारण्यची धमकी दिली. त्यानंतर देवेंद्रने सोनई पोलिस स्टेशनमध्ये जावून फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound