चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंजाबमधील पतियाळा येथे मोठी खळबळजनक घटना घडली आहे. येथे केक खाल्ल्ल्याने एका १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या वाढदिवशी कुटुंबियांनी ऑनलाईन केक मागविला होता. हा केक खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला, तर इतर ४ जणांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. मानवी असे या मुलीचे नाव आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, पतियाळा येथील अमन नगरातील रहिवासी असलेल्या काजलने २४ मार्च रोजी ६ वाजता एका ऑनलाईन कंपनीकडून केक मागविला होता. त्यानंतर अर्ध्या तासाने केक घरी आला. हा केक ७.१५ वाजता केक कापण्यात आला. केक खाल्ल्यानंतर मानवी आणि इतर कुटुंबियाची प्रकृती अवस्थ झाली. प्रत्येकाला उलटया होत होत्या. त्यांची लहान बहिणीची प्रकृती बिघडली. मग तिला दवाखान्यात नेले. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर लहान मुलीला मोठ्या कष्टाने वाचवण्यात यश आले. बाकीच्या कुटुंबाची प्रकृतीही बिघडली होती, ते कसेतरी वाचले होते.
कौटुंबिक समस्या असल्याने मानवी तिच्या आई आणि लहान बहिणीसोबत तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. याप्रकरणी पोलिस आरोग्य विभागाची मदत घेणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाचे पथक लवकरच संबंधित दुकानात नमुने भरणार आहे. पोलिसांनी कलम ३०४-अ आणि २७३ लागू करून गुन्हा दाखल केला आहेत. या कुटुंबाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.