Home राजकीय भाजप ओबीसी मोर्चातर्फे ना. गिरीश महाजन यांचा सत्कार

भाजप ओबीसी मोर्चातर्फे ना. गिरीश महाजन यांचा सत्कार

0
31

girish mahajan satkar obc morcha

जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील दणदणीत विजयाचे शिल्पकार ना. गिरीश महाजन यांचा आज भाजप ओबीसी मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला.

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या आठ जागांची जबाबदारी टाकण्यात आली होती. या सर्वच्या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून याचे श्रेय हे पूर्णपणे ना. गिरीश महाजन यांना जाते. या पार्श्‍वभूमिवर आज भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे ना. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, अनिल आर चौधरी, नारायण रणधीर, जयेश भावसार, संतोष बारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound