मंत्र्यांना निवासस्थानांचे वाटप : गिरीशभाऊ, गुलाबभाऊंना मिळाले ‘हे’ बंगले !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांना आज अधिकृतपणे शासकीय निवासस्थाने प्रदान करण्यात आली.

 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेतल्यानंतर बर्‍याच विलंबाने मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या आवडीची शासकीय निवासस्थाने मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले.

 

आज मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांमध्ये सर्व सदस्यांना बंगले मिळालेत. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांना सेवासदन हे निवासस्थान मिळाले आहे. तर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला मिळालेला आहे. दरम्यान, पालकमंत्रीपदांची देखील लवकरच घोषणा करण्यात येईल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content