जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । व्यवसायातील यशाबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मे. भंगाळे गोल्ड या पेढीने आज फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट म्हणून प्रदान केली.
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भंगाळे गोल्डचे संचालक सागर भंगाळे यांच्याकडून या गोल्फ कारची किल्ली औपचारिकपणे स्वीकारली. या प्रसंगी सौ. सुरेखा भागवत भंगाळे, चि. श्लोक भंगाळे, स्वप्निल महाजन आणि सौ. शितलताई महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम मे. भंगाळे गोल्डच्या सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम नमुना ठरला आहे. फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी ही इलेक्ट्रिक गोल्फ कार उपयुक्त ठरणार आहे. या भेटीमुळे ट्रस्टच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सागर भंगाळे यांनी यावेळी सांगितले की, सामाजिक कार्यात योगदान देणे हे त्यांच्या पेढीचे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि भविष्यातही असे उपक्रम सुरू राहतील.