गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून गुलाम नबी आझाद हे नाराज असल्याची माहिती समोर आली होती. या अनुषंगाने त्यांनी आज पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी थेट राहूल गांधी यांच्यावर तोफ डागली असून त्यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात आता भारत जोडो नव्हे तर कॉंग्रेस जोडो मोहिम आवश्यक असल्याचे परखड मत त्यांनी मांडले आहे.

आझाद यांनी आपल्या पत्रात कॉंग्रेस पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप देखील केला आहे. ते म्हणाले की, पक्षातील पदे ही निवडणुका घेऊन जाहीर होत असली तर हा सर्व देखावा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची लोकशाही नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसमध्ये आधीच जी-२३ या ग्रुपमधील ज्येष्ठ नेत्यांची उघड नाराजी असतांना आणि कपिल सिब्बल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी पक्ष सोडला असतांना आझाद यांचा राजीनामा हा कॉंग्रेस पक्षाला मोठा आघात मानला जात आहे.

 

Protected Content