चाळीसगाव, प्रतिनिधी | सह्याद्री प्रतिष्ठान या गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या आणि गड-किल्ल्यांचे महत्व भावी पिढीला पटवून देणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार दिलीप घोरपडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल किशोर पाटील युवा मंचतर्फे किशोर पाटील ढोमणेकर यांनी आज (दि.२९) त्यांचा सत्कार करून सन्मान केला.
यावेळी किशोर पाटील यांच्यासह ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे संपादक शेखर पाटील, व्यवस्थापक नितीन चौबे, ‘मराठा लाईव्ह’चे संपादक अशोक शिंदे, मंचचे कार्यकर्ते वासुदेव पाटील व नवल चव्हाण आदी उपस्थित होते.