रावेर प्रतिनिधी । घोडसगांव येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. याच्या निषेधार्थ मराठा कांती मोर्चातर्फे आज तहसीलदारास निवेदन दिले. तर शुक्रवारी दि. 26 जुलै रोजी शहरातील मार्केटमधुन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनात सुरेश इंगळे याने पिडीत मुलीच्या राहत्या घरी जाऊन बलात्कार केल्याप्रकरणी फास्ट-ट्रक कोर्टामध्ये वर्ग करुन पिडीत अल्पवयीन मुलीस त्वरीत न्याय मिळावा यासाठी शासनाने कठोरातील-कठोर कारवाई करावे असे निवेदनात नमुद केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी, पं.स.सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, हर्षल पाटील, आर.बी.महाजन, महेंद्र पाटील, वैभव पाटील, महेंद्र पाटील, सचिन पाटील, राजेंद्र चौधरी, तुषार पाटील, प्रशांत पाटील, योगेश महाजन, सारंग देशमुख, भूषण महाजन, धनराज महाजन, हरीष जगताप, शिवाजी पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते. तसेच मराठा कांती मोर्चा तर्फे येत्या शुक्रवार दि. 26 रोजी येथील छोरीया मार्केट मधुन मोर्चा काढण्यात येणार असून जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आला आहे.