यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मन वेल येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील श्री निवाशीनी सप्तशृगी देवीच्या मंदिरात घटस्थापना थोरगव्हाण संरपच सौ मनिषा समाधान सोनवणे व समाधान सोनवणे याच्या हस्ते घट पुजन करण्यात आले.
निवाशीनी श्री सप्तशृगी देवीच्या गडापर्यत येणाऱ्या व जाणाऱ्या भावीकांसाठी संस्थान मार्फत थेट गडापर्यत रस्ता तयार करण्यात आला संस्थांच्या वतीने विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. श्री निवाशीनी सप्तशृगी देवीचे लहानगड म्हणून जिल्हाभरातील भावीकांची श्रध्दा आहे.
तापी व मानकी नदीच्या संगमा जवळ श्री सप्तशृगी देवीचे मंदिर कोळन्हावी गावातून तापी नदी मधून बोट ने थेट श्री सप्तश्रुगी मातेच्या मंदिरात तर मनवेल थोरगव्हाण मार्ग थेट गडा पर्यत रस्ता तयार करण्यात आला असुन थेट वाहणे जात आहे.
पंचक्रोशीतील हजारो भावीकांचे श्रध्दास्थांन असलेल्या श्री निवाशीनी सप्तशृगी देवीच्या यात्रा उत्सव निम्मत संस्था मार्फत विविध धार्मिक कार्यक्रम होत असून भावीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष योगराज साळुखे , सचिव प्रतापदादा सोनवणे,सरपंच योगिताताई सोनवणे ,आण्णा सोळंके , उपाध्यक्ष शांताराम सोळंके ,पो.पा.सुधाकर सोळंके सह पदाधिकारी परीश्रम घेत आहे