मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सर्वजण कडाक्याच्या उष्णतेमुळे हैराण झालेले असतांना भारतीय हवामान खात्याने लवकरच मान्सून राज्यभरात सक्रीय होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
भारतीय हवामान खात्याने आधीच मान्सून आल्याची घोषणा केली होती. तर स्कायमेटने अजून मान्सून येणार नसल्याचे सांगितले होते. या दरम्यान बिपरजॉय वादळ येऊन गेले. तरीही राज्यातील बहुतांश भागात आज जूनचा शेवट येत असतांनाही पाऊस न पडल्याने सर्व जण त्रस्त झालेले आहेत. या पार्श्वभूमिवर, भारतीय हवामान खात्याचा ताजा अंदाज हा दिलासा देणारा ठरणारा आहे.
हवामान खात्यानुसार उद्या अर्थात शुक्रवारपासून राज्यात मान्सून चांगल्या प्रकारे सक्रीय होऊ शकतो. मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या किनारपट्टी भगात यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल. यानंतरच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर मान्सून राज्यातील बहुतांश भागात स्थिरावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.