Home Cities भुसावळ रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम त्वरीत सुरू करा- मुख्याधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम त्वरीत सुरू करा- मुख्याधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डिस्को टॉवर ते रजा टॉवर दरम्याच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम त्वरीत सुरू करावी, अशी मागणी नगरसवेक शेख पापा शेख कालु यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेने डिस्को टॉवर ते रजा टॉवर दरम्यानचा रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाला मंजूरी देवून प्रत्यक्ष ठेकेदाराने काम सुरू केले. पंरतू ठेकेदाराने डिस्को टॉवर, शनीमंदीर वार्ड, काझी प्लॉट पर्यंत रस्त्याचे काम केले. पुढे पापा नगर ते रजा टॉवर पर्यंतच्या रस्त्याचे काम थांबविले आहे. त्यामुळे पुढील रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत केलेल्या कामाची बिले अदा करू नये अशी मागणीचे निवेदन नगरसवेक शेख पापा शेख कालु यांनी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनावर शेख मुश्ताक शेख आमद, राजेंद्र पाटील, मोहम्मद शाहनबाज मोहम्मद अनवर, धामा पिंजारी, शेख इमरान शेख पापा, शकिल शहा, अलताफ शेख, फारूख शाह सुभान शाह, शेख शब्बीर शेख कुबीर, शेख सलिम शेख कलीम, शेख मोहसीन शेख हुसैन, जाफर शहा, शेख अकील शेख माजीद, अकील मिस्मिल्ला, फकिर मुसा, शरीफ तांबोली यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


Protected Content

Play sound