भुसावळ प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपुर्वी भुसावळ गोळीबार प्रकरण ताजे असतांना आज दोन जणांना अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक केली असून त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत माहीती अशी की, शहरातील प्रभाकर हॉल जवळील संशयित आरोपी नितीन समाधान इंगळे (वय-29) रा. सहकार नगर, गुरूद्वाराजवळ हा अवैधरित्या गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर साहिल तडवी, संजय पाटील, सोपान पाटील, जुबेर शेख या पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी नितीन इंगळे याला अटक करून त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम-3/25,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.