गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूससह एकाला अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विनापरवाना गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या संशयित आरोपीला चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दुचाकी, गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस, मोबाईल आणि रोकड जप्त केले आहे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोपडा तालुक्यातील लासुर ते सत्रासेन रस्त्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे. मनीष सुभाष जगताप रा. महादेव मंदिराजवळ क्रांती चौक, शिरपूर जि. धुळे असे अटक केलेल्या संस्थेत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस, दुचाकी क्रमांक (एमएच ०४ ईएल ०३०८), मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पथकाची यशस्वी कामगिरी
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथकातील पोहेकॉ राकेश पाटील, रावसाहेब एकनाथ पाटील, चेतन महाजन, गजानन पाटील, विनोद पवार यांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि पोकॉ विनोद पवार हे करत आहे.

Protected Content