चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळ दुचाकीवरून अवैधपणे गावठी कट्टी व चार जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या दोन जणांवर चोपडा ग्रामीण पोलीसांनी कारवाई केली आहे. दोघांकडून गावठी कट्टी व काडतूस हस्तगत केले असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार हनुमंत पवार वय २० आणि भरत सुकदेव जायगुळे वय २२ दोन्ही रा. जामवाडी ता.जामखेड जिल्हा नगर असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळून दुचाकी दोन जात असून त्यांच्याजवळ गावठी कट्टी आणि काडतूस असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता कारवाई कर तुषार हनुमंत पवार वय २० आणि भरत सुकदेव जायगुळे वय २२ दोन्ही रा. जामवाडी ता.जामखेड जिल्हा नगर दोघांना अटक केली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि दुचाकीहस्तगत केली आहे. याप्रकरणी पो.कॉ. रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी वाणी ह्या करीत आहे.