चोपडा येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

चोपडा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिसांना गुप्त माहिती वरून मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी अधिक टाकलेल्या छाप्यात पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

२४ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नायरा पेट्रोल पंपाच्या मागील भागात एका घरी धाड टाकली असता मोहम्मद कादिश शेख आयुब वय ३८ रा. केजीएन कॉलनी नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्लीमध्ये राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊन मध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा १,८७,३०३ रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर करवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्यसूचना दिल्या प्रमाणे पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनरीक्षक अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे , योगेश्वर हिरे, फौजदार जितेंद्र सोनवणे, हवालदार संतोष पारधी, शिपी, ज्ञानेश्वर जवागे, पोलीस नाईक संदिप भोई, पोलीस शिपाई प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनिकांत भास्कर, अक्षय सुर्यवंशी, समा तडवी अशांनी सदरची केली आहे.

Protected Content