चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा येथे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच दोन काडतूस पोलिसांच्या छापामारीत हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दि. २३ रोजी रात्री ८:३० वाजता चोपडा – शिरपूर रस्त्यावर बंद असलेल्या टोल नाक्याजवळ दुचाकी क्रमांक एम.एच.१४ के. एल.४३०३ वरील स्वार आकाश गणेश चव्हाण वय २४ रा. तळेगाव दाभाडे पुणे ह.मु. वाल्मिक नगर पनवेल यांचेकडे गावठी बनावटीच्या पिस्टल (सिल्व्हर रंगाचा कट्टा) व पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्याने आकाश चव्हाण यांच्यावर गुरनं. ५३७/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ सह मुंबई पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दिनांक २४/१०/२०२४ रोजी ०१.१४ वाजता दाखलगुन्हा नोंद करण्यात आला सदरील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्यासूचना दिल्या प्रमाणे पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनरीक्षक अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे , योगेश्वर हिरे, फौजदार जितेंद्र सोनवणे, हवालदार संतोष पारधी, शिपी, ज्ञानेश्वर जवागे, पोलीस नाईक संदिप भोई, पोलीस शिपाई प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनिकांत भास्कर, अक्षय सुर्यवंशी, समा तडवी अशांनी सदरची कारवाई केली आहे.