गावठी पिस्तूलासह दोन जणांना अटक; वरणगाव पोलीसांची कारवाई

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव पोलिस स्टेशन हट्टीत असलेल्या टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तून व जिवंत काडतूस खरेदी विक्री करताना व कब्जात बाळगतांना मिळून आलेले दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, असा एकुण ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघांवर वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सोमवार रोजी सशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कस्टडी मिळाली आहे .

तालुक्यातील टहाकळी फाटा जवळ सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी २३जून रोजी रात्री ११ ३० वाजता सापळा रचून यावेळी संशयित आरोपी सागर प्रकाश डिके उर्फ सत्या राहणार टहाकळी तालुका भुसावळ , आकाश विष्णू सपकाळे राहणार रायपूर तालुका रावेर या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतूस, असा एकूण ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुरंन कलम सी सी टी एन एस गुरनं१२३ / २०२४ शस्त्र अधिनियम ३ / २५ .७ / २५ प्रमाणे नुसार वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन करीत आहे. ३० हजार रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा व त्यास तपकिरी रंगाची मूठ व मॅक्झिन असलेला गावठी पिस्तोल व चार हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काढतोस प्रति दोन हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content