यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील गौरव चंद्रकांत सोनवणे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीयकृत इंडियन बँकेत अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सोनल सर्व्हिसेस मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेतून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
गौरव सोनवणे हे चंद्रकांत (आप्पा) सोनवणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव व नंदकिशोर सोनवणे यांचे पुतणे आहेत. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण औरंगाबादच्या MIT कॉलेजमधून BE (मेकॅनिकल) या शाखेत पूर्ण झाले आहे. माध्यमिक शिक्षण त्यांनी देवगिरी कॉलेज, औरंगाबाद येथे घेतले.
गौरव सोनवणे यांच्या परिश्रम, सातत्य आणि जिद्दीने मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण सोनवणे कुटुंब, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात जाण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यासाठी केलेली कठोर मेहनत यामुळे त्यांना हे यश मिळाले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
गौरव यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद, अथक परिश्रम आणि धैर्य महत्त्वाचे ठरले, असे मत संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) आणि संपूर्ण डांभुर्णी परिवाराने व्यक्त केले. स्वयंदीप प्रतिष्ठान, डांभुर्णी, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र मराठा सेवा संघ, जळगाव यांच्या वतीनेही त्यांचे विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले आहे. गौरव यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डांभुर्णी गावाचा आणि संपूर्ण सोनवणे परिवाराचा अभिमान वाढला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.