रावेर (प्रतिनिधी) काळ्या मातीतून सोनं निर्माण करणाऱ्या व समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या भूमिपुत्रांचा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार देऊन साप्ताहिक कृषीसेवकतर्फे उदया येथे सन्मान करण्यात येणार आहे. कृषीसेवकच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन येथील माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल व कृषीमंत्री आ. एकनाथराव खडसे असतील. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल यांचे हस्ते पुरस्कार वितरण करून व भूमिपुत्रांना सन्मानित करण्यात येईल.
दिपप्रज्वलन व गौरव सोहळ्याचे उद्घाटन माजी कृषी आयुक्त डॉ. पाडुरंग वाठारकर यांचे हस्ते संपन्न होणार आहे. पुरस्कारार्थीच्या कार्याचा आढावा असलेल्या विशेषांकाचे प्रकाशन खा. रक्षाताई खडसे व आ. हरिभाऊ जावळे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, शिरीष चौधरी, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश धनके, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष के.बी. पाटील, कृषीसमर्पण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनायक शिंदे (अहमदनगर) , कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक महेश कडूस-पाटील (पुणे), रोमीफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी (पुणे), जळगाव जिल्हा सिड्स–फर्टिलायझर–पेस्टीसाईड असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माउली फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, उद्योजक अजय चौधरी (भुसावळ), श्रीराम पाटील, जितेंद्र पवार, डॉ. प्रशांत सरोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन आयोजक कृष्णा पाटील यांनी केले आहे.