पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आलेला गौरव पाटील हा तरूण पाचोर्याचा असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या पालकांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणार्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास असणार्या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या त्याचे आयटी चे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील यांचे वडील म्हणाले की, माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला देशाची सेवा करायची असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही. माझा मुलगा हा पेट्रोल पंपाच्या वर काम करायचा आणि एक दिवस फोन करून त्याला मुंबईला बोलावले आणि अटक केली त्यावेळी मला खूप धक्का बसला अशी माहिती गौरवच्या वडिलांनी दिली आहे. माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केली आहे.
तर, गौरव अर्जुन पाटील याच्या अटकेची माहिती आज मिळताच परिसरात एकच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.