भुसावळ प्रतिनिधी– येथील इंदिरा नगरच्या मागे वाहनात गॅस रिफिलिंगचा करण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी सापळा रचून चारचाकी वाहन, घरगुती गॅस सिलेंडर व रिफिलिंगची मशीन पोलीस ठाण्यात जमा केली असून आरोपी फरार झालेला आहे.
याबाबतची माहिती अशी की, इंदिरा नगरच्या मागे शेख वसीम शेख सलिम (वय २५) हा वाहनांमध्ये गॅस रिफिलींगचा व्यवसाय करीत असून घरगुती सिलेंगरचा वापर करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस कर्मचार्यांना मिळाली. यावरून त्यांनी इंदिरा नगरमध्ये वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना छापा टाकला असता आरोपीला माहिती मिळताच वाहन क्रमांक एमएच १५ – एएच ७३८२ तसेच रिफिलींगचे साहित्य व घरगुती गॅस सिलेंडर जागीच सोडून फरार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.ही कामगिरी ए.एस.आय. तस्लिम पठाण, ए.एस.आय. अंबादास पाथरवट, पो.कॉ.दीपक जाधव, पो.कॉ. निलेश बाविस्कर, पो.ना.सुनील थोरात,पो.कॉ. समाधान पाटील,सचिन चौधरी, कृष्णा देशमुख, संदीप परदेशी, विनोद वितकर,अश्विनी जोगी अशांनी केली.