जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी 1 फेब्रुवारी रोजी जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात विशेष पदग्रहण व नियुक्ती सोहळा उत्साहात पार पडला. संघटनेच्या विस्तारासह पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा आणि कल्याणासाठी नव्या दमाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आल्याने कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांच्या एकमताने झालेल्या निवडींमुळे संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत दिलीप पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून चेतन रवींद्र वाणी, तर जळगाव शहराध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. यासह इतरही पदांवर विविध सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम होते. मंचावर केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, केंद्रीय उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री (ता. धुळे) येथील संघटनेचे पदाधिकारी जोशीला पगारिया, तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी आणि राजेश यावलकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्रस्तावनेत अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी संघटनेची भूमिका, ध्येयधोरणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत संघटनेची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचे कौतुक करत पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून एकजूट दाखवून ठामपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. पत्रकारांच्या समस्या, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या विषयांवर संघटना सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियुक्ती प्रक्रियेदरम्यान उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव पाटील, कार्याध्यक्षपदी चाळीसगावचे मुराद पटेल, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, सचिवपदी मंगल पाटील आणि संघटकपदी राकेश विजय वाणी यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी वसीम शब्बीर खान, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत सोनवणे, सुमित सुरेश देशमुख व दीपक वामन पवार, सहसचिवपदी राजेंद्र यु. पाटील, खजिनदारपदी पंकज शेटे आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी विश्वजीत चौधरी यांची निवड झाली.
जळगाव शहर कार्यकारिणीत शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद, सचिवपदी योगेश रमेश चौधरी, उपाध्यक्षपदी पवन खंबायत, नितीन पुंडलिक सोनवणे व निखिल अशोक मोरे, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे, खजिनदारपदी गोकुळ सोनार, शहर संघटकपदी भूषण हंसकर, सहसंघटकपदी राजेंद्र रामराव पाटील आणि सदस्यपदी इकबाल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय सचिव भगवान सोनार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वजीत चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



