ट्रॅक्टरमधून कचऱ्याची गळती : नागरिकांमध्ये नाराजीचे सूर

भुसावळ प्रतिनिधी । शहरात नगरपालिकेचे सफाई कर्मचारी नियमितपणे गटार आणि कचरा साफसफाई करतात. हा जमा झालेला कचरा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ट्रॅक्टरमधून कचऱ्याची गळती होत असल्याने ही घाण संपूर्ण शहरात पसरत आहे. यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. 

शहरात पालिका सफाई कामगार नाले सफाई करुन काढलेला गाळ हा वर काढून ठेवला जातो. या कचऱ्याची उचल करून ट्रॅक्टरद्वारे शहराबाहेर डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र ज्या ट्रॅक्टर द्वारे कचरा नेला जातो, यातून शहरभर कचरा रस्त्यावर फेकला जातो. ट्रॅक्टरच्या पाठोपाठ इतरही वाहने रस्त्याने ये-जा करतात. यावेळेस कचऱ्यावरून वाहन गेल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ट्रॅक्टर सुरू असतांना यातून मोठ्या प्रमाणावर काढलेला गाळ तसेच मोठमोठे दगड बांधकामाचा मलबा रस्त्यावर पडत जाते. या ट्रॅक्टर समोरून वाहन येत असताना वाहनासमोर कचऱ्याचा ढीग पडल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर दुरुस्ती करून कचऱ्याचे योग्यरिता वाहतूक करण्याची आवश्यकता आहे.

 

Protected Content