जळगाव, प्रतिनिधी | श्री दत्त सांस्कृतिक मंडळ संचलित माता अष्टभुजा देवी मंदिर येथे नवरात्री तयारीला वेग आला असून मंडळातर्फे मंदिराच्या प्रांगणात दांडिया व गरबा प्रशिक्षणासमोठया उत्साहात सुरुवात झाली आहे.
नवरात्रीनिमित्ताने माता अष्टभुजा देवी मंदिर येथे दांडिया व गरबा प्रशिक्षणात देण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबिरात दररोज सायंकाळी ६ ते ७.३० वाजे दरम्यान परिसरातील जवळपास १०० मुली व महिलां सहभागी होत आहेत. संगीता चौधरी व ज्योती राणे हे प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराच्या नियंत्रक म्हणून अपेक्षा चौधरी या काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे मंदिराची तसेच मूर्तींच्या रंगरंगोटीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. जयपूर(राजस्थान) येथील कलाकार मूर्तींना रंगरंगोटी करीत असून नवरात्री दरम्यान मंदिराच्या प्रांगणात गरबा व दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत तरी परिसरातील महिला व मुलींनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय तायडे व सचिव भागवत चोपडे यांनी केले आहे.