चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| तालुक्यातील खडकी येथील घराला अचानक झालेल्या शार्टसर्कीटमुळे गॅरेज दुकानाला आग लागून दुकानातील सामान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. यात एकुण ८ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र लक्ष्मण एरंडे वय ४३ रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे त्यांचे गॅरेज दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी २८ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता त्यांच्या गॅरेज दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे अचाकन आग लागली. या आगीत सुमारे ८ लाख ७७ हजार रूपयांचे किंमतीचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरींकांनी धाव घेवून ही आग विझविण्यात आली. या घटनेप्रकरणी बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.