नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृध्दी महामार्गावर महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने दोन वाहनांमधून तब्बल ४२ लाख रूपयांचा २१४.८०० किलो गांजा ताब्यात घेतला आहे. सुरक्षारक्षकांना पाहून वाहनात असलेले दोन्ही व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे प्रभारी मिलिंद सरवडे यांनी याबाबत वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना कळवले. पवार यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, सचिन काकड, गोविंद सूर्यवाड, साहेबराव बलसाने, सचिन कहाने यांनी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली.
जप्त केलेल्या वाहनांची किंमत पंधरा लाख ४७ हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनांसोबत असलेले दोन्ही इसम अंधाराचा फायदा घेत समृद्धीची सुरक्षा भिंत ओलांडून पसार झाले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस संशयितांचा परिसरात शोध घेत होते