धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील चोपडा-धरणगाव रस्त्यावर दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजे सुमारास चोपड्याकडून विना विना नंबरची मोटरसायकल गाडीवरून आरोपी ज्ञानेश्वर अमृत चौधरी वय ७६ रा. मुक्काम तावसे बुद्रुक पोस्ट कुरवेल तालुका चोपडा यांनी पांढऱ्या रंगाची गोणी मध्ये ४८०००रू गांजा १२०० ग्रम वजनाचा बांधले ला होता माल आणला होता त्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल गाडीवरून विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजा सदृश्य पाला पाचोळा व भुकटी करून विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगताना मिळून आल्याने धरणगाव पोलिसांच्या पथकातील सर्व अधिकारी अंमलदारांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांनी स.पो.नि. निलेश वाघ पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद व पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान पवार महेंद्र बागुल सुधीर चौधरी संदीप पाटील योगेश पाटील यांनी सदर छापा टाकून कारवाई केली आरोपी विरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब, प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आरोपीस अटक करण्यात आलेली आहे याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद चंदन विष्णू पाटील पोलीस कॉन्स्टेबल धरणगाव पोलीस स्टेशन यांनी दिली आहे