यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावाचे जावाई शहीद गनी रज्जाक पटेल यांचे औद्योगिक सुरक्षा दलात सेवा बजावताना तारापूर भोईसर (सीआयएसएफ) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उद्या धुळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
शहीद गनी पटेल यांचे मुळ गाव हे धुळे जिल्ह्यातील चिंचवार हे असुन कोरपावली येथील माजी सरपंच तथा सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल यांचे मोठे मेहुणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. दरम्यान उद्या दि.१३ जुन रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या धुळे येथील कबस्थानात दफनविधी ( अंत्यसंस्कार ) करण्यात येणार असल्याची माहीती त्यांच्या कुटुबींकडुन मिळाली