६०० घड्याळांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक; बदलापूर पोलिसांची कारवाई

बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरमधील घोरपडे चौकातल्या टायटनच्या शोरुममधून सुमारे ६०० घड्याळांची चोरी झाली होती. या महागड्या घड्याळांची किंमत लाखोंच्या घरात होती. या घटनेमुळे बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बदलापूर पोलिसांना अखेर ही चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं आहे.

बदलापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक या चोरांचा तपास करत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणात चादर गँग सहभागी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणातील काही आरोपी बिहारमध्ये पळून गेले होते. त्यानंतर बदलापुर पोलिसांनी बिहार गाठत काही आरोपींना बेड्या ठोकल्या, तर काहींना मुंबईतून अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर चार आरोपी फरार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान अटक असलेल्या या तीन तिन्ही चोरांकडून 406 घड्याळे आणि 64 मोबाईल असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच फरार आरोपी आणि उर्वरित मुद्देमाल पकडला जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांनी दिली आहे.

Protected Content