मुक्ताईनगरातील किड्सझोन इंग्लिश मीडियम शाळेत गणेशोत्सव साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणेशोत्सवानिमित्त मुक्ताईनगर मधील किड्स झोन इंग्लिश मीडियम शाळेमध्ये महाआरती व महिला पालकांसाठी थाळी सजावटीची स्पर्धा संपन्न झाले. मुक्ताईनगर येथील डॉ. जगदीश पाटील बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे गणरायाची स्थापना करण्यात येत असते. ह्यावर्षी शाळेतर्फे विविध स्पर्धा तसेच रोज पालकांना आरतीसाठी आमंत्रित करण्यात येत असून आज आरतीसाठी नागेश मोहिते पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, आकाश काळे एलआयसी एजंट मुक्ताईनगर, प्रशांत चौधरी पोलीस कर्मचारी मुक्ताईनगर, पंकज कपले पत्रकार मुक्ताईनगर या दाम्पत्यांना आरतीचा मान मिळाला. सर्व महिला पालकांसाठी आज शाळेतर्फे सजवलेली पूजेची थाळी या विषयावर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेमध्ये अश्विनी चौधरी, टीना जैन, मंजुषा घोडके, शामल तळेले, शुभांगी कपले, मुक्ता भोलाणे या महिला पालकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या सोहळ्याप्रसंगी निरीक्षक म्हणून अर्चना जैन व संगीता सिसोदिया यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. वैशाली दुट्टे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी वृंदांचे चांगले योगदान लाभले. तसेच शाळेचे पालकांकडून व व शहरांमधून सार्वत्रिक कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content