सावद्यात अनंत चतुर्थीनिमित्त गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र सुरु

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी किशोर चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा नगरपालिकेने मोठा आड, इंदिरा गांधी चौक आणि गांधी चौक येथे श्री गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, कोविड-19 प्रार्दुभावाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश तसेच घरगुती गणेश विसर्जन याबाबत शासनाने नेमुन दिलेल्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरीता तसेच पर्यावरणाचें संवर्धन व संरक्षणासाठी सावदा नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अन्तर्गत सावदा नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्टेशन रोड सावदा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुडांची निर्मिती / सोय करण्यात आली आहे. तसेच ज्या नागरीकांना सदर ठिकाणी विसर्जनासाठी जाणे शक्य होणार नाही अशा नागरीकांकरीता सावदा नगरपालिकेने मोठा आड, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक येथे श्री गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन केंद्र सुरू करण्याचे नियोजन केंलेले आहे. नगरपरिषदे मार्फत संकलन केलेल्या गणेशमुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात येईल. तरी नागरीकांनी कोविड-19 चा प्रार्दुभाव पाहता विसर्जन ठिकानी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या गणेश विसर्जन कुंड  तसेच गणेश संकलन केंद्राचा लाभ घ्यावा ही अशी विनंती करण्यात आली आहे.

 

Protected Content