पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे यांचे आकस्मात मृत्यु

अमळनेर प्रतिनिधी । पातोंडा तालुक्यातील न्यू प्लॉटमध्ये राहणारा गणेश पाटील (वय-३६) काल संध्याकाळी जम्मू -काश्मीरमधील सांबा येथे कर्तव्यावर असताना अचानक मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सोनवणे हे 14 मराठा बटालियन मधे सेवेत कार्यरत होते. त्याची आता पर्यंत 16 वर्ष 9 महीने सेवा झाली असून ते येत्या डिसेंबर महिन्यात 17 वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होते.तितक्यात त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यांचे देह (शव) आर्मीचे  सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई व मुंबई हून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पातोंडा येथे येणार आहे. त्या करीता आवश्यक होकार त्यांची पत्नी सीमा हिने आर्मी अधिका-यांना कळवले असल्याचे समजते.गणेशचा अंत्यसंस्कार शक्यतोवर ७ रोजीच पातोंडा येथे सर्व शासकीय इतमामात होणार आहेत.

गणेशच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी सीमा, दोन मुली एक 12 वर्ष व दुसरी 9 वर्ष असा परीवार आहे.

दरम्यान (दि ०५)काल रोजी अचानक सैन्यदलातील एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि संपूर्ण कुटुंबाची घालमेल झाली.जम्मू कश्मीर येथे एका अपघातात गणेश सोनवणे या जवानाचे आकस्मिक निधन झाले.अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. शहिद जवान गणेश सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी समस्त गावातील तरुण वर्गाने पुढाकार घेतला असून, सर्वचजण मोठ्या तयारीला लागले आहेत.

 

Protected Content