अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळंबु येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांची नुकतीच आदिवासी पारधी महासंघ या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील फारशी रोडवरील बुद्ध विहारात संघटनेचे राज्य सचिव रा.ना.सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली पारधी समाजाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने तालुक्यातील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांना नियुक्ति पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी बौध्द पौर्णिमानिमित्त बौध्द विहार येथे आदिवासी पारधी महासंघाचे राज्याचे पदाधिकारी रा.ना.सोनवणे, सुरेश सोनवणे, दिपक खांदे, सचिन साळुंखे, मुकेश साळुंके, वासुदेव भगत,असे राज्याचे पदधिकारी यांनी बुद्धाला वंदन करून मिटींगला सुरुवात केली.
या प्रसंगी श्री. सोनवणे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन समाजासाठी लढा उभारला पाहिजे. त्या करिता गणेश चव्हाण यांच्या सारखे सच्चे कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून समाजाने होणाऱ्या अन्याया विरुद्ध वज्रमूठ उगारली पाहिजे. सध्याचे सरकार विनाकारण पारधी तरुणांना गुन्हेगार बनवीत आहे. या विरोधात 31 मे रोजी पारधी समाजाचा मंत्रालयावर आक्रोश महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर त्यांनी अमळनेर तालुका कार्याकारणी जाहिर केली. त्यानुसार कार्यकारणीत तालुका अध्यक्षपदी गणेश चव्हाण, सचिवपदी शिवाजी पारधी, उपाध्यक्ष भिमराव पारधी, कार्यध्याक्ष वाल्मिक चव्हाण, कोषाध्यक्ष सुनिल पारधी, सहकोषाध्यक्ष दिनेश पारधी, शहर प्रमुख अर्जुन पारधी, उपशहर प्रमुख राजा सोनवणे, संघटक भास्कर पारधी, समाधान पारधी, सदस्य म्हणून संजय पारधी, बिपीन चव्हाण, अजय पारधी यांची निवड करण्यात आली आहे.
गणेश चव्हाण यांच्या निवडी बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष आणासाहेब रामभाऊ सनदांशीव यांनी पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. चव्हाण यांच्या निवडीमुळे समाज बांधवामध्ये नवं चैत्यन निर्माण झाल्याचे दिसले. विशेषतः तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. गणेश चव्हाण हे वार्ताहर म्हणून ‘गाव माझं’ या न्यूज चॅनलमध्ये कार्यरत आहे. पत्रकार संघटनेने सुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे.