कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) पारोळा व एरंडोल तालुका गाळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन व अनुगामी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा शुभारंभ प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते आज (दि.१५) अंजनी धरणात करण्यात आला.
या प्रसंगी आदर्श शेतकरी आर.डी. पाटील, प्रसाद दंडवते व परिसरातील खडकेसीम, खडके खु., जवखेडसीम, कासोदा, पिंपळकोठा गावातील शेतकरी उपस्थित होते. या अभियानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतीची गुणवत्ता वाढणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अनुगामी संस्थेचे सागर रायगडे, वस्ती मित्र अतुल मराठे, अर्जुन पाटील, विशाल पाटील, सुयोग पाटील आदी प्रयत्न करीत आहेत.