जळगाव (प्रतिनिधी) संकट मोचक मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने त्यांच्याकडे गाळेधारक आपली व्यथा पुन्हा मांडणार आहेत. आता आमच्या अपेक्षा गिरीशभाऊंकडूनच असल्याची प्रतिक्रिया डॉ. शांताराम सोनवणे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.
गाळेधारकांसंदर्भात शासनाचे नवीन परिपत्रक आले आहे ज्यात गाळेधारक यांच्या हक्कांबाबत कसा निर्णय घेतला जाणार त्या दृष्टीने त्यात उल्लेख करण्यात आला नसल्याने आज गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुत डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेऊन चर्चा केली. ज्याप्रमाणे गाळेधारकांना अनेक नेत्यांनी आमदार, खासदार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाळेधारकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. . परंतु या नवीन अधिसूचनेत गाळेधारकांच्या हिताचा दृष्टीने उल्लेख करण्यात आलेला नाही ही बाब आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी १८ व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेतली. तसेच या शिष्टमंडळाने यासंदर्भात महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनावणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना निवेदन दिले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पालक या नात्याने गाळेधारक गिरीश महाजन यांना भेटणार आहेत. महाजन यांनी गाळे धारकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शिष्ट मंडळाकडून व्यक्त करण्यात आली. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गाळेधारकांचा प्रश्न गिरीश महाजन सोडवतील अशी आशा डॉ. शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी रमेश मतानी, राजस कोतवाल, संजय पाटील, राजेश वरयानी, तेजस देपुरा, चेतनदास कारडा, बबलु समदडीया, राम हळंदी, युवराज वाघ, पंकज मोमाया, मनोहर नाथानी, दिपक मंधान, वसिम काझी, सुरेश पाटील, केशव नारखेडे, राजेश समदाणी, राजेंद्र शिंपी, सर्व मार्केटचे प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.