जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठेतील वसंतस्मृती भाजपा कार्यालयात भाजपा भटके विमुक्त जाती जमाती आघाडीच्या युवक महानगराध्यक्षपदी गजानन वंजारी यांची आज (दि.१८ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजता निवड करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या शिफारशीनुसार गजानन वंजारी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र आज बळीरामपेठेतील भाजपा कार्यालयात देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी गजानन वंजारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, स्थायी समिति सभापती राजेंद्र घुगे पाटील, जळगाव भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी, जिल्हाध्यक्ष शालिक पवार यावेळी, ग्रामीण सरचिटनीस अनिल जोशी, शिक्षक आघाडीचे महानगर अध्यक्ष संजय घुगे यावेळी उपस्थित होते.