पाचोरा प्रतिनिधी । येथे संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी शहरातून पालखी काढण्यात आली असून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
येथे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन उदयोग समूहातर्फे देशमुखवाडी येथे सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी पालखी काढण्यात आली. याचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. महाराजांची पालखी मिरवणूक, महाआरती, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आले. तसेच दुपारी १२ते ३ पर्यत महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे .
गजानन महाराजांची महाआरती गजानन उदयोग समूहाचे राजाराम सोनार पत्नी सह यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर परिसरातून महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उदयोग समूहाचे प्रमोद सोनार योगेश राजाराम सोनार डॉ दिनेश सोनार दत्ता सोनार कमलेश सोनार यांनी परिश्रम घेतले.
पहा– गजानन महाराज पालखी मिरवणुकीचा व्हिडीओ.