अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी कळमसमरे ग्रामपंचायतीला भेट दिली असता घरकूल प्रकरणी कारवाईचा इशारा दिला.
तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी अचानक भेट दिली. याप्रसंगी त्यांनी घरकूल प्रकरणात कारवाईचा इशारा दिला. घरकुल लाभार्थिनी वेळेत घरकुलाचे बांधकाम करावे अन्यथा कारवाई करण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत. यात येथील गावातील सुमारे ४५ लाभार्थी यांनी दहा दिवसाच्या आत घरकुलाचे बांधकाम सुरु करावे.अन्यथा घरकुलाचा पहिला हप्ता जमा करावा. अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आशयाचे पत्र कळमसरे ग्रामपंचायत कार्यालयाने काढले आहे.दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी हे तालुक्यातील गडखांब, मारवड, कळमसरे येथे भेटी देत विविध योजना कामाचा आढावा घेतला.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी कळमसरे येथील गावातील पात्र घरकुल लाभार्थी यांची घरोघरी जाऊन भेट घेत चर्चाही केली. यावेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे, श्री. कठारे, घरकुल अभियंता स्वप्निल सिसोदे, रोहयो चे तालुका समन्वयक श्री ठाकरे, ग्राम विकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील ग्राम पंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
निधी वाढवून मिळावा : लाभार्थ्यांची मागणी
दरम्यान, शासकीय योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. मात्र एवढ्या रकमेतून घरकुलाचे काम पूर्ण होणार नाही. वाळू, सिमेंट, लोखंड, विटा, मजुरीचे दर गगनाला भिडले असल्याने ते शक्य नाही असेही यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी सांगितले. घरकुलाचे काम लाऊनही ते या पैशात पूर्ण होणार नाही. हातात पैसा नाही या विवंचनेत असल्याचेही काहीनी सांगितले