जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावातील 17 वर्षीय अल्पवयीने मुलगी 17 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेदरम्यान कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिच्या आईवडीलांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू मुली मिळून आली नाही. गावातील एका व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा दावा मुलीच्या आईवडीलांनी केला आहे. मंगळवारी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.