मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील जि.प.शाळा लोहारखेडा येथील शाळेतल्या शिक्षकानी शाळेला नाविन्यपूर्ण रंगरंगोटी करून शाळेचा चेहरामोहरच बदलून टाकला आहे. शाळेचाच नव्हे, तर निरागस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याने तेजाची झळाळी आणण्याचे काम येथील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने केले आहे. अश्या आनंददायी शिक्षणाने मुलांचे शिक्षण अधिक परिणामकारक होते असे शाळा खोली उद्घाटन प्रसंगी आमदारचंद्रकांत पाटील यांनी प्रतिपादन केले.
जि.प.शाळा लोहारखेडा शाळेत नवीन दोन वर्गखोल्या बांधण्यात आल्या असून मुलांच्या शिकण्याचा विचार करून अत्यंत बोलकया भिंती करण्यात आल्या असून मुलांना सहज शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शाळेने स्वतः मोठी परसबाग विकसित केली असून त्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला जात आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शाळा खोली उद्घाटन प्रसंगी मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, बोदवड येथील गटशिक्षणाधिकारी भास्कर लहासे, डायटचे शैलेश पाटील तालुक्यातील शिक्षक व लोहारखेडा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एम.सी अध्यक्ष प्रदीप पाटील, शाळेचे शिक्षक मनोज लुल्हे, नितिन धोरण ह्यांनी परिश्रम घेतले.
चित्रांकडे मुले लवकर आकर्षित होतात. चित्रांच्या माध्यमातून आपलेपणा वाटावा व मुलांचे सहज शिक्षण व्हावे ह्या हेतूस्तव शाळेत रंगरंगोटी करण्यात आली असून घरच्यासारखे वातावरण करण्याचा प्रयत्न शाळेत केला जात आहे. परिणामी मुख्यामंत्री शाळा सुंदर शाळा अभियानात शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. परसबागेत शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. हयाकामी शाळा व्यवस्थापन समिती लोहारखेडा तसेच ग्रामपंचायत लोहारखेडा ह्यांचे अनमोल सहकार्य मिळत आहे.
– मनोज लूल्हे, मुख्याध्यापक लोहारखेडा