खूनाच्या गुन्ह्यातील फरार बंदी महिला आरोपीला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेल्या बंदी फरार महिला आरोपीला तिच्या टोणगाव ता. भडगाव येथून सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक घेतले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, खूनाच्या गुन्ह्यात मालेगाव पोलीस ठाण्यात २०११ मध्ये दाखल गुन्ह्यातील निर्मलाबाई अशोक पवार रा. टोणगाव ता. भडगाव या महिला आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. ती नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना शासनाच्या आदेशान्वये कोरोना प्रादुर्भावमुळे बंदी कैद्यांची ४ जुन २०२२ पर्यंत रजेवर सोडविण्यात आले होते. दरम्यान, दिलेल्या रजेच्या मुदतीत महिला आरोपी ही नाशिक जेलमध्ये हजर न झाल्याने तिला फरार घोषीत करण्यात आले. महिला आरोपी ही तिच्या गावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तिला गावातून सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ गावातून अटक केली आहे.

 

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, किशोर राठोड, पो.कॉ. विनोद सुभाष, महिला पोहेकॉ रत्ना मराठे, उपाली खरे, चालक पोहेकॉ राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

Protected Content