पुणे-वृत्तसंस्था | गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाल्मीक कराड याने आज अखेर पुणे पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मीक कराड याचे नाव आले आहे. त्यांच्यावर पवनउर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रूपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण सध्या मोठे तापले असून यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासूनच वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज सकाळी तो पुणे पोलिसांना शरण आला आहे. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.