दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या फरार संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत तरूणाला मध्यरात्री घरात घुसल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने शहरातील गवळीवाड्यात  १२ सप्टेंबर २०२ रोजी सकाळी दगडफेक झाली होती. यातील फरार असलेला संशयित आरोपी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय-२२) रा. तांबापूरा याला एमआयडीसी पोलीसांनी आज सोमवारी राहत्या घरातून अटक केली आहे.

१२ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२) रा. तांबापूरा हा गवळीवाड्यातील रवि हटकर यांच्या घरात घुसला. त्यावेळी रवी यांच्या घरात महिला ह्या एकट्याच होत्या. त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिं बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनूसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. ताबापूरा हे सर्वजण गवळीवाड्यात चालून आले. त्यांना हटकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती.  या दगडफेकीत उखा खंडू हटकर (वय-४५) रा. गवळीवाडा आणि भोलासिंग हे दोघे किरकोळ जखमी झाले होते. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात भोलासिं बावरी, मोनूसिंग बावरी, सोनूसिंग बावरी, मोहनसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी, सतकौर बावरी, समीर काकर, रिझवाना काल्या यांच्यासह इतर ४ ते ५ जणांवर एमआयडीसी पोलीसात सुनिता रविंद्र हटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मोनुसिंग उर्फ मोन्या जगदीशसिंग बावरी हा फरार होता. संशयित आरोपी मोनसिंग हा आज राहत्या घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, हेमंत कळस्कर, मुदस्सर काझी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, पोलीस चालक सुरेश अहिरे यांनी कारवाई करत मोनूसिंग बावरी याला आज सकाळी अटक केली. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Protected Content