धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागातून फळविक्रेत्याची २५ हजार रुपये किमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, शेख वसीम शेख रशीद (वय-३२) रा. धरणगाव जि.जळगाव हे फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीई ४५९२) क्रमांकाची दुचाकी आहे. त्या दुचाकीचा वापर ते दैनंदिन कामासाठी करतात. २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शहरातील चेतन मोबाईल दुकानासमोर येऊन त्यांनी दुकानासमोर दुचाकी पार केले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली. परंतु दुचाकी कुठेही आढळून आले नाही. अखेर ३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार योगेश जोशी करीत आहे.