पंढरपूरात शालेय पोषण आहाराच्या खिचडीत बेंडूक

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक आढळला आहे. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेला किडा आढळला होता. परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता.

हे बेडकाचे पिल्लू त्याआधीच मरुन पडले होते. त्यामुळे खिचडीच्या कॉलिटीवर किती भरवसा ठेवला जाऊ शकतो. असा सवाल उपस्थित झाला आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Protected Content