जळगाव, प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दि.२० जुलै रोजी राजेश मेडीकल व जनरल स्टोअर्सचे शटरचे कुलुप तुटुन व त्याची शटरची पटटी वाकवुन त्यामधील २२ हजार रुपयांची चोरी झाली होती. या चोरीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने भडगाव तालुक्यातील कजगाव येथून अटक केली आहे.
गोंडगाव येथे विनायक काशीनाथ कोतकर यांचे राजेश मेडीकल व जनरल स्टोअर्स असे दुकान असून २० जुलै रोजी तेथे चोरी झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे गुरन.१०३/२०१९ भादवि.क.४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, पोहेकॉ. विजय पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील, किरण चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार मिथुनसिंग मायासिंग बावरी (वय -२८, रा.कजगाव) हा चोरी घरफोडीमध्ये मिळालेल्या पैश्यांवर मौजमजा करीत आहे. त्याला पथकाने त्याच्या घरुन ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील चोरी गेलेल्या मालापैकी सात हजार रुपयांचा मुद्देमाल त्याचे कडुन जप्त करण्यात आलेला आहे.