जळगाव, प्रतिनिधी | वॉटर ग्रेस कंपनीला शहरातील कचरा संकलनाचा मक्ता देण्यात आला आहे. या कंपनीच्या कार्यप्रणालीवर विरोधकांनी आक्षेप घेत महासभेत लक्षवेधी मांडली असता साभृहात गोंधळाची परिस्थितीनिर्माण झाली होती.
ही महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते. शिवसेनेचे नागरसेवक प्रशांत नाईक यांना कचरा संकलनकरतांना मक्तेदाराचे कामगार कचऱ्याच्या गाडीचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती भरतांना दिसले होते. त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यामुळे हा मक्ता रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. परंतु, मक्तेदारास मक्ता मिळून केवळ पंधरा दिवस झाल्यान्ये त्यास एक संधी द्यावी असे सत्ताधाऱ्यानी मत मांडले. मक्तेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी शिवसेना सदस्यांनी लावून धरली होती. धुळे महापालिकेत याच मक्तेदाराने एक मुस्त ठेक्यात दगड, गोटे, माती भरून वाढीव वजन दाखवीत असल्याने तेथील प्रभारी आयुक्त गंगाधरन यांनी पाळत ठेऊन हा प्रकार उघडकीस आणला व या मक्तेदाराच्या बिलांची आदागयी रोखण्यात आली आहे. यामुळे या मक्तेदारासोबत ५ वर्षाचा करार का करण्यात आला आहे असा प्रश्न शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला तर भाजपाचे नगरसेवक कैलास सोनावणे यांनी मक्तेदारास काम सुरु करून केवळ १५ दिवस झाल्यने त्यास संधी देण्यात यावी असी मागणी केली. शिवसेना सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेत हा मक्ता रद्द करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती.