पोलीसात तक्रार दिल्यावरून एकाला काठीने मारहाण

बतपउम

अमळनेर (प्रतिनिधी)। चारित्र्यावर नेहमी संशय घेता म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असलेल्या फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, विजय सोनू लोंढे व संजय सोनू लोंढे हे दोघे फिर्यादी महिला अमळनेरातील गांधलीपुरा येथील रहिवशी हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत वाद घालत होता. नेहमीच्या या कृत्यामुळे राग येऊन सबंधित महिलेने अमळनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात धाव घेतल्याचा राग आल्याने २६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चौधरी गल्लीत फिर्यादिस अडवून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर संजय लोंढे यांच्या सांगण्यावरून विजय लोंढे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठीने वार करून फिर्यादिस जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करीत आहेत.

Add Comment

Protected Content