Home Cities जळगाव दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने मराठी व्याकरणावर मोफत कार्यशाळा

दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने मराठी व्याकरणावर मोफत कार्यशाळा


जळगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध अशा दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने एमपीएससी,पीएसआय, एसटीआय,एएसो तसेच सरळसेवा,कृषी,वनरक्षक व पोलिस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या मराठी व्याकरणावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३ फेब्रुवारी २०१९ रविवार रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत अॅड.डॉ.आशालता गुट्टे ( पुणे) एम. ए.,एम.फिल.,पीएच.डी.,सेट (मराठी),एल. एल. बी. या मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळा ग.स. स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सद्गुरू एज्युकेशन सोसायटी, ख्वाॅजामिया चौक, गणेश कॉलनी, जळगाव येथे होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी गुट्टे प्रकाशनाच्या सर्व पुस्तकावर ५०% सवलत मिळणार आहे.अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी ७२६२०९८४१७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.वासुदेव पाटील यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound