रावेर प्रतिनिधी । अनिल चौधरी परिवर्तन मंचतर्फे शहरवासियांना पायपीट करावी लागू नये यासाठी टँकरची मोफत सेवा प्रदान करण्यात आली आहे.
रावेरवर आकस्मित जलसंकट आल्याने,शहरवासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी अनील चौधरी परिवर्तन मंचकडून शहरात ८ टँँकर सुरू करण्यात आले आहेत. यांच्या मदतीने दररोज सुमारे ४० वेळा टँँकर भरून शहरवासीयांची तहान भागवण्याचे काम नित्यनेमाने सुरु आहे. आज दुसर्या दिवशी देखील सर्वच भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
तापी नदीतील पाणी पातळी आटल्याने शहराला पाणी पुरवठा होणार्या प्राधिकरणाच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. शर्थीचे प्रयत्न करूनही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने,शहरात पाणी मिळत नसल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, अनिल चौधरी यांनी तातडीने ८ टँँकर बोलवून शहरात पाणी पुरवठा केल्याने,नागरिकांना या अडचणी पासून दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वार्डात पाणी देण्यासाठी स्वत: अनिल चौधरी, त्यांचे पुत्र धीरज व पुतण्या सचिन चौधरी लक्ष ठेवून आहेत.